कोलकात्याहून पुण्याकडे जाणाऱ्या 2 वाहनातून 7.861 किलो सोने जप्त
महासमुंद : खरा पंचनामा
एका महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये, छत्तीसगढ राज्यातील महासमुंद पोलिसांनी कोलकात्या हून पुण्याकडे जात असलेल्या २ वाहनातून तस्करी होत असलेले एकूण 7.861 किलोग्राम सोने जप्त केले आहे, ज्याची किंमत अंदाजे पाच कोटी रुपये आहे.
महासमुंद पोलीस यांनी सांगितले की, बिस्किटे आणि पातळ पानांच्या स्वरूपात जप्त केलेले सोने हे पाच जणांच्या ताब्यातून घेण्यात आले.
रस्ते नाकाबंदी वेळी पोलिसांना संशयास्पद वाटून गाड्यांची झडती घेतली असता मागच्या सीटखाली एका चेंबरमध्ये चार पाकिटे सापडली. हे लोक खडगपूर-कोलकाता महामार्गावरून महाराष्ट्रातील पुण्याच्या दिशेने सोने घेऊन जात होते. कारमधून प्रवास करणाऱ्यांकडून पाच वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, सोन्याची बिस्किटे आणि सोन्याची पाने जप्त करण्यात आली.
तस्करीसाठी वापरलेली दोन वाहनेही त्यात एक पश्चिम बंगालमधील नोंदणीचे तर दुसरे महाराष्ट्रातील सोलापूर येथील नोंदणीचे वाहन, जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेले सोने डीआरआयकडे सुपूर्द करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.