महिलेचा खून करून 2 महीने फरारी असलेल्यास अटक
सांगली : खरा पंचनामा
महिलेचा खून करु दोन महिने फरारी असणाऱ्यास अटक करण्यात आली. तो अट्टल गुन्हेगार असून विश्रामबाग पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.
सचिन उर्फ पोप्या माने (वय 33, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो सांगलीत 100 फुटी रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
शहापूर येथे 29 ऑक्टोबर रोजी एका महिलेचा त्याने खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो पसार झाला होता. सांगलीत चोरी केल्याप्रकरणीही विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. 100 फुटी रस्त्यावर त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.