कापसाच्या शेतात लावलेला 20 किलो गांजा जप्त
चकलांबा पोलिसांची कारवाई
बीड : खरा पंचनामा
जिल्ह्यातील काजळा परिसरात कापसाच्या शेतात लागवड केलेली 20 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याची बाजार भावानुसार 2 लाख रुपये किंमत होते. यप्रकरणी जमिनीच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी चकलांबा पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली.
काजळा गट क्रं 68 मध्ये कापसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची गोपनिय माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली. त्यानंतर चकलांबा पोलिसांनी आज बुधवारी दूपारी दोनच्या दरम्यान छापा मारला. यावेळी 20 किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी जमिन मालक नारायण श्रीमंत डोगरे (वय 48, रा. काजळा ता. गेवराई, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले.
चकलांबा ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे, नायब तहसिलदार संजय सोनवणे, मंडल अधिकारी दत्तात्रय शेंबडे, पोलिस उपनिरीक्षक तांगडे, पोलिस उपनिरीक्षक इंगळे, हवालदार राम बारगजे, प्रकाश खेडकर, कैलास गूजर आदिनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.