ईडीच्या अधिकाऱ्यांवर 200 जणांचा हल्ला, वाहने फोडली
कलकत्ता : खरा पंचनामा
रेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक पश्चिम बंगालमध्ये सातत्याने छापे टाकत आहे. याच कारवाईसाठी शुक्रवारी ईडीचे पथक छापे टाकण्यासाठी उत्तर परगणा येथे पोहोचले. मात्र ईडीच्या पथकातील अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घेराव घालून गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तसेच जमावाने ईडी अधिकाऱ्यांच्या तसेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोडही केली.
ईडीच्या टीमवरील हल्ल्याचे हे प्रकरण उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखळी गावात घडले रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे पथक तेथे पोहोचले. मात्र तेव्हा अचानक 200 लोकांच्या जमावाने ईडीच्या टीमवर अचानक हल्ला केला. जमावाने ईडी अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार, छापा टाकण्यासाठी आलेल्या टीममध्ये ईडीच्या सहाय्यक संचालकाचाही समावेश होता. जमावाने त्यांची गाडीही फोडत बरीच नासधूस केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.