चेन स्नेचिंग करणाऱ्या 3 सराईताना अटक; 8 गुन्हे उघडकिस
7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त; सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली, सातारा जिल्ह्यासह मुंबई, कर्नाटक येथे चेन स्नैचिंग करणाऱ्या 3 सराईत चोरट्याना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकिस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, 3 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
सुधाकर अशोक मोहिते (वय 35, रा. कोतीज ता. कडेगाव), भास्कर उर्फ संभाजी सावंत (वय 29, रा. कोतीज ता. कडेगाव), कादर शरीफ काजी (वय 24, रा. अंबक, ता. कडेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 5 डिसेंबर रोजी इस्लामपूर येथील बहे नाका परिसरात प्रिती पाटील यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करण्यात आले होते. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्याना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे विशेष पथक तयार केले होते.
पथक चोरट्याना शोधत असताना किले मछिन्द्रगड येथील खिण्डित रेकॉर्डवरील गुन्हेगार चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसुन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुह्याची कबूली दिली. त्यांना अटक करून चोरीचे दागिने, 3 दुचाकी असा 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील मोहिते, सावंत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली, सातारा, मुंबई, कर्नाटक येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून इस्लामपुर येथील 3, तासगाव, कुंडल येथील प्रत्येकी 2, कराड येथील 1 गुन्हा उघडकिस आला आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अरुण पाटील, कुबेर खोत, दीपक गायकवाड, अभिजित ठाणेकर, रोहन गस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.