Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

32 हजारांची लाच घेताना पलूसच्या तलाठ्यास अटक सातबारा नोंदीसाठी घेतले पैसे, सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

32 हजारांची लाच घेताना पलूसच्या तलाठ्यास अटक
सातबारा नोंदीसाठी घेतले पैसे, सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

खरेदी केलेल्या जमीनीची सातबारा नोंद घालण्यासाठी पलूस येथील तलाठ्याला 32 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सोमवारी दुपारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पलूसच्या तहसील कार्यालय परिसरात ही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

बाबुराव बाळासो जाधव (वय 39, रा. बुर्ली, ता. पलूस) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जाधव पलूस येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार व्यक्तीच्या वडिलांनी त्यांच्या नावे जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीची सातबारा नोंद घालण्यासाठी तलाठी जाधव यांने तक्रारदाराकडे सुरुवातीला 40 हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडी नंतर 32 हजार रुपये लाचेची मागणी केली.

मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जाधव याच्याविरोधात सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने याची पडताळणी केल्यानंतर कुंभार याने लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी दुपारी तक्रारदाराकडून 32 हजारांची लाच घेताना जाधव याला पलूस तहसील कार्यालय परिसरात रंगेहात पकडण्यात आले. तलाठी जाधव याच्याविरोधात पलूस पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय, निमशासकीय लोकसेवकांनी लाच मागितल्यास 9821880737 या मोबाईल क्रमांकावर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक पाटील यांनी केले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, ऋषिकेश बडणीकर, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, धनंजय खाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.