Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळयात

40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळयात



पुणे : खरा पंचनामा

पुणे शहर पोलिस दलातील अलंकार पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या लक्ष्मीनगर पोलिस चौकीत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांच्यावर 40 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

पुणे एसीबीने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली असून काही वेळापुर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांच्यावर 40 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी पुणे अॅन्टी करप्शनने कारवाई केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.

पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी कशाबद्दल 40 हजार रूपायाची लाच घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अॅन्टी करप्शनचे अधिकारी प्रकरणाची चौकशी करीत असून लवकरच माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, पोलिस उपनिरीक्षकावर 40 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.