राज्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
कविता नेरकर चाळीसगावच्या अपर पोलिस अधीक्षक
मुंबई : खरा पंचनामा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगलीच्या तत्कालीन पोलिस उपअधीक्षक कविता नेरकर यांची जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. सध्या त्या मुंबईतील सायबरच्या पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने याबाबतचे आदेश बुधवारी काढण्यात आले आहेत.
बदली करण्यात आलेले अधिकारी कंसात कोठून कोठे बदली : निमित गोयल (समादेशक राज्य राखीव बल छत्रपती संभाजीनगर ते पोलिस उपायुक्त नागपूर शहर), राजेंद्र कुमार दाभाडे (पोलिस उपायुक्त ठाणे शहर ते पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे), वैभव कलबुरमे (प्राचार्य पीटीसी लातूर ते अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर, अहमदनगर), संजय जाधव (अतिरिक्त नियंत्रक नागरी संरक्षण व गृह रक्षक दल मुंबई ते अपर पोलिस अधीक्षक बारामती), स्वाती भोर (अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर, अहमदनगर ते पोलिस अधीक्षक लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर), पराग मनेरे (उपायुक्त विशेष सुरक्षा एसआयडी मुंबई ते पोलिस उपायुक्त ठाणे शहर), संदीप जाधव (पोलिस आयुक्त नागरी हक्क संरक्षण ठाणे ते पोलिस उपायुक्त मुंबई शहर), हिम्मत जाधव (पोलिस उपायुक्त मुंबई शहर ते पोलिस उपायुक्त पुणे शहर), अपर्णा गिते (पोलिस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर ते प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र लातूर), दत्तात्रय कांबळे (प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र अकोला ते पोलिस उपायुक्त मुंबई शहर), विशाल गायकवाड (पोलिस अधीक्षक पोलिस अकादमी नाशिक ते पोलिस उपायुक्त पिंपरी चिंचवड), काकासाहेब डोळे (पोलिस उपायुक्त पिंपरी चिंचवड ते पोलिस अकादमी नाशिक).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.