"लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं"
पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर
सोलापूर : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी त्यांनी 2 हजार कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी केली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधितही केले. सोलापुरात पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
असंघटित आणि विडी कामगारांसाठी 350 एकर परिसर, 834 इमारती, 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी विठ्ठलाला नमन करत आणि सिद्धेश्वराला नमन करत केली. यावेळी बोलताना, "22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी 11 दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशिर्वादानं मी तिकडे जाणार आहे. माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिक येथील पंचवटी येथून झाली. महाराष्ट्र राममय झाला आहे याचा मला आनंद आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. तसंच आज एक लाखापेक्षा जास्त लोकांना घर मिळत आहे त्यामुळे मला आनंद होतो आहे असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी, "मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, असे म्हणत मोदींना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. त्यांचा कंठ दाटून आला आणि त्यांनी आपला आवंढा गिळला. हजारो कुटुंबांची स्वप्न जेव्हा साकार होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी पुंजी असतात असं म्हणताना मोदी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, आपल्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, असे मोदी म्हणाले.
पुढे पंतप्रधानांनी "इतके दिवस गरिबी हटावचा नारा दिला जात होता. पण गरिबी हटली नव्हती. मी अहमदाबादमध्ये राहिलो आहेत. ती देखील कामागारांची भूमी आहे. पद्मशाळी कुटुंबांनी मला कधीही उपाशी ठेवलं नाही. सोलापूरमधल्या एका गृहस्थांनी मला विणलेलं एक चित्र पाठवलं होतं असे म्हणत मोदींनी त्यांच्या सोबत सोलापूरचे नाते असल्याचे सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.