राज्य उत्पादन शुल्कच्या बदल्यांना मिळाला मुहूर्त!
पुण्याच्या विभागीय उपायुक्तपदी सागर धोमकर यांची नियुक्ती
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत पोलिस, महसूल प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागालाही बदल्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बदल्यांना आज मुहूर्त मिळाल्याचे स्पष्ट झाले.
राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीने एका अधिकाऱ्याच्या बदलीचे गुरुवारी आदेश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे रत्नागिरीचे अधीक्षक सागर धोमकर यांची पुण्याचे विभागीय उपायुक्त म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही काढण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.