चेन स्नैचिंग करणाऱ्या दोघांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
वाळवा तालुक्यात विविध ठिकाणी चेन स्नैचिंग करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी, चोरीचे दागिने असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
परमेश्वर गंगाराम काळेबाग (वय 39, रा. किल्ले मछिन्द्रगड, मूळ रा. आळसंद, ता. पंढरपुर), बाजीराव रामा नरळे (वय 40 रा. आळसंद, ता. खानापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चेन स्नैचिंग करणाऱ्याना पकण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना इस्लामपूर रस्त्यावरील गोटखिंडी फाटा येथे दोघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला.
गोटखिंडी फाटा येथे दोघे दोन दुचाकी घेऊन संशायास्पदरित्या थांबल्याचे पथकाला दिसले. पथकाने त्याना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे दागिने सापडले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी ती हिसडा मारून चोरल्याची कबुली दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आष्टा, इस्लामपूर, कुरळप परिसरातुन चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन दुचाकी, दागिने जप्त करण्यात आले आहेत.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल ऐनापुरे, अरुण पाटील, कुबेर खोत, प्रकाश पाटील, रोहन गस्ते, कॅप्टन गुंडवाडे, स्वप्नील नायकूडे, अजय पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.