Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत घर फोडणाऱ्या दोघांना अटक दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, संजयनगर पोलिसांची कारवाई

सांगलीत घर फोडणाऱ्या दोघांना अटक
दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, संजयनगर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

शहरातील जुना कुपवाड रस्ता परिसरातील बंद घर फोडून साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, लॅपटॉप, प्रिंटर असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती संजयनगरचे पोलिस निरीक्षक सुरज बिजली यांनी दिली. 

आकाश सतीश कवठेकर (वय २६, रा. उमेदनगर, कुपवाड), शुभम गजानन कदम (वय २६, रा. वसंतनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जुना कुपवाड रस्त्यावरील स्वामी समर्थ सोसायटी येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी रियाज शेख यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर निरीक्षक बिजली यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला यातील चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते. 

रविवारी आकाश कवठेकर हा भारत सूतगिरणीजवळ संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने शुभम कदम याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने शुभम यालाही ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी, लॅपटॉप, प्रिंटर असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोजकुमार लोंढे, कपील साळुंखे, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, माणिक सावंत, सुशांत लोंढे, दशरथ शेजाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.