राज्यातील १४ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर राज्यातील १४ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन यांच्या सहीने मंगळवारी रात्री उशीरा बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेल्या सहायक निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली : संतोष शिंदे (नाशिक शहर ते नाशिक परिक्षेत्र), सोनुताई झामरे (अमरावती शहर ते नागपूर शहर), पूजा खांडेकर (अमरावती शहर ते नागपूर शहर), अंकुश माने (सोलापूर शहर ते नांदेड परिक्षेत्र), सुनील अंकोलीकर (सोलापूर शहर ते नाशिक शहर), वसंत पवार (सोलापूर शहर ते नाशिक शहर), विरेंद्र केदारे (अमरावती शहर ते नागपूर परिक्षेत्र), रोहित केदार (नाशिक शहर ते ठाणे शहर), नानासो सावंत (सोलापूर शहर ते औरंगाबाद परिक्षेत्र), हेमंत फड (नाशिक शहर अमरावती शहर), ब्रह्मदेव देशमुख (सोलापूर शहर ते अमरावती शहर), रोहित चौधरी (सोलापूर शहर ते अमरावती परिक्षेत्र), शीतल हिरोडे (अमरावती शहर ते नागपूर शहर), सत्यवान भुयारकर (अमरावती शहर ते नागपूर शहर).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.