जयसिंगपुरात पतसंस्थेसह सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
तब्बल पन्नास लाखांचे नुकसान
कोल्हापूर : खरा पंचनामा
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरातील एका पतसंस्थेसह सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तब्बल पन्नास लाखांचे नुकसान झाल्याच्या अंदाज वर्तवला जात आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत जयसिंगपूर, कुरूंदवाड पालिकेच्या अग्नीशमन दलासह दत्त कारखान्याच्या अग्नीशमन दलाने अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली. दरम्यान शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वतर्वला जात आहे.
जयसिंगपूर येथीलल नृसिंहवाडी रस्त्यावरील शिवाजी चौक परिसरात स्टेशनरी, एक पतसंस्था, चहा आणि बुक स्टोअर एका जुन्या इमारतीत आहेत. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास यातील एका दुकानाला आग लागली. त्याची माहिती समजेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. त्या दुकानासह शेजारी असलेली अन्य दुकाने, पतसंस्था यांनाही आग लागली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. अग्नीशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
एकाचवेळी पतसंस्थेसह सात दुकानांना आग लागल्याने आग विझवताना अग्नीशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी दहा वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. दरम्यान चहाच्या दुकानात असलेली गॅसची सिलिंडर नागरिकांनी वेळीच हलवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत धनवडे पतसंस्था, विराज स्टेशनरी, चौगुले बुक स्टॉल, एसएमएम कलेक्शन, पाटील चहा आदी दुकानांचे तब्बल पन्नास लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.