Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील जुगार अड्ड्यांवर छापेमारी सुरुच सात ठिकाणी कारवाई; पाउण लाखांचा मुद्देमाल जप्त

मिरजेतील जुगार अड्ड्यांवर छापेमारी सुरुच
सात ठिकाणी कारवाई; पाउण लाखांचा मुद्देमाल जप्त



सांगली : खरा पंचनामा

मिरज शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने पुन्हा छापेमारी केली. शहरातच सात ठिकाणी कारवाई केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणणाले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. पाउण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिरज शहरात अवैध धंदे असल्याची तक्रार सामाजिक कार्याकर्त्यांनी केली होती. त्यानंतर अधीक्षकांनी तातडीने दखल घेतली. छापेमारी करत संबंधित प्रभारी अधिकाऱ्याची तडकाफडकी बदलीही करण्यात आली आहे. शहरातील नूर हॉटेजवळ भारत कुंजीरे (वय ४४) याच्यावर कारवाई करत १२७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ उल्हास कांबळे, नुरल घोडिमार यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून १३३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरातील एका टी स्टॉलजवळ अमीर पठाण याच्यावर कारवाई करत १०८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुभाषनगर येथील हुळ्ळे प्लॉट येथे सोहेल खान, सिराज कोतवाल यांच्यावर कारवाई करत ६०५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच शहरातील मंगल चित्रमंदिरजवळील बोळात राहुल गणपती फाटे याच्यावर कारवाई करत २३४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, महात्मा गांधी पोलिस चौकीच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली. अमर चित्रमंदिर येथे मटका घेणाऱ्या नऊ जणांवर करवाई झाली. त्यात मेहबुब शेख, हुसेन शेख, बाजीराव पाटील, आनंद फल्ले, महादेव कट्ट्याप्पा, बशीर मोमीन, सीराज कोतवाल, संजय पाथरूट यांच्यावर कारवाई झाली. सर्वांकडून ५४ हजार ९९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.