फडणवीसांचं भाषण सुरु असतानाच लाभार्थ्यांचा राडा; शेकडो लोकांनी पळवले आरोग्य कीट
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजी नगर इथल्या कार्यक्रमात मेडिकल कीट मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी चांगलीच धक्काबुक्की आणि पळवापळवी झाल्याचं पहायला मिळालं. फडणवीसांचं भाषण सुरु असतानाच हा प्रकार घडल्यानं कार्यक्रमाचा फज्जा उडाला.
आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात विविध साहित्य वाटपाचा आणि विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठेवण्यात आलं होतं. यावेळी फडणवीसांचं भाषणही होणार होतं, त्यानंतर लाभार्थांपैकी कामगार, खेळाडू आणि सर्वसामान्यांसाठी विविध प्रकारच्या कीटचं वाटप करण्यात येणार होतं.
पण हा कार्यक्रम संपेपर्यंत लोकांना स्वस्थ बसवलं नाही आणि त्यांनी फडणवीसांचं भाषण सुरु असतानाच हे कीट पळवापळवी सुरु केली. काही लोकांनी तर कीट ज्या ठिकाणी ठेवले होते त्या ठिकाणचं मांडवाचे पत्रे काढून वाट निर्माण केली आणि खोके आणि पेट्या पळवल्या. यानंतर फडणवीसांना आपलं भाषण आवरतं घ्यावं लागलं. यावेळी काही लोकांनी एकमेकांना हाणामारी देखील केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.