उत्कृष्ट अधिकारी म्हणून वर्ध्याचे जिल्हाधिकारी कर्डिले व त्यांच्या पत्नीची निवड
पुणे विभागात जितेंद्र डुडी यांची निवड : मतदार नोंदणी अभियान
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात २०२३-२४ या कालावधीत निवडणूक विषयाच्या अनुषंगाने उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कामगिरीची नोंद राज्य शासनाने घेतली आहे. यात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागनिहाय निवड राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार व सत्कारासाठी करण्यात आली आहे.
नागपूर विभागातून वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून याच विभागातून त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डीले यांची निवड झाली आहे. अमरावती विभागातून अकोलाचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, पुणे विभागातून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नाशिक विभागात नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री, छत्रपती संभाजीनगर विभागात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे, तर कोकण विभागात सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून अमरावती विभागात अकोला येथील अनिता भालेराव, पुणे विभागात सातारा येथील अतुल नेत्रे, कोकण विभागात ठाणे येथील अमित सानप, नाशिक विभागात नाशिकचे विशाल नरवडे, छत्रपती संभाजीनगर विभागात लातूरचे सुशांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय प्रियंका कर्डीले - देवळी, अतुल नेत्रे - कराड दक्षिण, अमित सानप - भिवंडी पूर्व, विशाल नरवडे - कळवण, अमिता भालेराव - अकोला पश्चिम, सुशांत शिंदे - उदगीर यांनी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून या विधानसभा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.