'...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार'; जरांगे पाटलांची मोठी घोषणा
जालना : खरा पंचनामा
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. राज्य सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान त्यांनी आज पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा बांधवांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. कायदा केला तर फायदाही झालाच पाहिजे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी केलेल्या कायद्याच्या आधारे सग्यासोयऱ्याला किमान एक तरी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
कायदा बनवण्याच्या बाबतीमध्ये पंधार दिवस विचारमंथन झालं. जितका विरोध होईल तितका विषय मोठा असतो. विरोधकांना शांततेतच उत्तर द्या. आता पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे. ते जितक्या हरकती घेतील, तितक्याच आपणही घ्यावात. मात्र त्या पॉझिटिव्ह असाव्यात. सोशल मीडियाच्या माध्यामातून का होत नाही पण सरकारवर दबाव निर्माण करा.
आपल्या सोयऱ्यांच्या बाबतीत खोटं काहीच करायचं नाही, मात्र खरं असेल तर मग प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. राजपत्र हे काही कायद्यात बदल करायचा असेल तेव्हा निघत असते. असा बदल राज्यपालाच्या अधिकारात करावा लागतो. कायदा होईपर्यंत आपल्याला सावध राहिचं आहे. कायदा केला तर फायदाही झालाच पाहिजे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी केलेल्या कायद्याच्या आधारे सग्या - सोयऱ्याला किमान एक तरी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.