कुणीही अपात्र ठरणार नाही, कुणाच्याच विरोधात निकाल लागणार नाही, पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता?
मुंबई : खरा पंचनामा
आमदार अपात्रता प्रकरण निकालासंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज कुणाच्याच विरोधात निर्णय लागणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जाऊन फैसला करावा अशा निर्णयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळण्याची शक्यता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काही वेळातच घेणार आहेत. त्या आधीच सूत्रांनी ही माहिती दिली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यात येणार नाही. त्यामुळे दोन्ही गटांना काही आक्षेप असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मूभा असेल. त्याचवेळी शिंदे गटाला अधिकृतपणे शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात येणार आहे अशीही खात्रीलायक माहिती मिळत आहे.
शिवसेना आमदार अपात्र निकाल वाचनाला साडे चार वाजता होणार सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एक ते दीड तास निकालाचे वाचन करणार असून निकालातील ठळक मुद्दे आधी वाचले जातील.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे, तर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यावर आज राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत. यामध्ये कोणत्यात गटाला अपात्र ठरवण्यात येणार नसून, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात जाऊन करावा असा फैसला समोर येऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदेंच्या आमदारांना नाराज केल्यास ते नाराज होऊ शकतात, तर ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवल्यात ते नाराज होऊ शकतात. त्यामुळे यामध्ये एक सुवर्णमध्ये साधला जाऊ शकतो. हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळे जर असा समतोल निकाल आल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.