Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या; १४ अधिकाऱ्यांची पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या; १४ अधिकाऱ्यांची पहिली यादी जाहीर



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. यात मराठवाड्यातील पाच तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा १४ उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि सहायक आयुक्तांचा समावेश आहे.

विशेषतः अधिकाऱ्यांच्या बदल्या त्या-त्या विभागाअंतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर करण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्याचे नाव : बदली कोठून-कोठे
श्रीकांत उंबरकर (अचलपूर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ), सुभाष चौधरी (नागपूर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर), महेंद्रकुमार कांबळे (धाराशिव जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड), राजकुमार माने (धाराशिव उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड), गंगाराम तळपाळे (अहमदनगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, धुळे), रामेश्वर रोडगे (छ. संभाजीनगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली), जनार्दन विधाते (छ. संभाजीनगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, परभणी), संदीप कुलकर्णी (नांदेड उपजिल्हा निवडणूक अधिकारी, धाराशिव), भारत कदम (छ. संभाजीनगगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, लातूर), अरविंद अंतुलीकर (धुळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव), बालाजी शेवाळे (चंद्रपूर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग), विवेक घोडके (अमरावती उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली), प्रमोद भामरे (धुळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नंदुरबार), कृष्णा जाधव (परतूर, जालना मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई)

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.