मिरजेच्या महात्मा गांधी चौकचे पोलिस निरीक्षक भालेराव यांची मुख्यालयात तडकाफडकी बदली!
मिरज : खरा पंचनामा
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. दरम्यान, अवैध धंदे बंद करण्याचे आदेश असतानाही खुलेआम गांधी पोलिस चौकीच्या हद्दीत व्यवसाय सुरु होते. याबाबत महात्मा गांधी चौकचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांची मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
मिरजेतील काही भागात अवैध धंद्यांसह मटका जोमात सुरू असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या पथकाने मिरज महात्मा गांधी पोलिस चौकीच्या हद्दीत काही ठिकाणी छापे टाकले. यावेळी खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचे या पथकाला निदर्शनास आले.
दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भालेराव यांची मुख्यालयात तडकाफडकी बदली केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.