मराठा आरक्षण सरकारचा मोठा निर्णय!
वंशावळानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत हालचाली
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन केले जात आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी समर्थकांसह मुंबईची वाट चालत आहेत. तसेच २६ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण देखील सुरू करणार आहेत. यादरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठं पाऊल उचललं आहे.
राज्य सरकारकडून वंशावळानुसार कुणबी प्रमाण पत्र देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वंशावळ प्रमाण पत्रांचे वाटप करण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे.
तहसीलदार व नायब तहसीलदार यांना वंशावळानुसार प्रमाण पत्र वाटपाचे अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.