राज्यातील ४९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
संदीप घुगे सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक
सांगलीचे एसपी डॉ. तेली यांची सीआयडी पुण्याकडे पदोन्नतीने बदली
मुंबई : खरा पंचनामा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल ४९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगलीच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. घुगे सध्या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. सांगलीचे मावळते अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नतीवर सीआयडी पुण्याच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने याबाबतचे आदेश बुधवारी काढण्यात आले आहेत.
पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आलेले अधिकारी कंसात कोठून कोठे बदली : रितेश कुमार (पुणे शहर आयुक्त ते महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य), अमितेश कुमार (नागपूर शहर आयुक्त ते पुणे शहर आयुक्त), प्रभात कुमार (अपर पोलिस महासंचालक व उपमहासमादेशक होमगार्ड ते संचालक नागरी संरक्षण, मुंबई), रविंद्र कुमार सिंघल (अपर पोलिस महासंचालक वाहतूक ते पोलिस आयुक्त नागपूर शहर), शिरीष जैन (सह आयुक्त एसआयडी, मुंबई ते आयुक्त एसआयडी, मुंबई), दीपक पांडे (विशेष पोलिस महानिरीक्षक महिला व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध ते अपर पोलिस महासंचालक महिला व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध, मुंबई), दत्तात्रय कराळे (पोलिस सह आयुक्त ठाणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र), संजय शिंदे (सह आयुक्त पिंपरी चिंचवड ते विशेष पोलिस महानिरीक्षक सीआयडी, पुणे), प्रवीण पवार (विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र ते सह आयुक्त पुणे शहर), प्रवीणकुमार पडवळ (सह आयुक्त वाहतूक, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके, मुंबई), संजय दराडे (विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र), ज्ञानेश्वर चव्हाण (विशेष पोलिस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र ते सह आयुक्त ठाणे शहर), एस. डी. येनपुरे (विशेष पोलिस महानिरीक्षक सीआयडी ते सह आयुक्त नवी मुंबई).
एन. डी. रेड्डी (पोलिस आयुक्त अमरावती ते पोलिस आयुक्त अमरावती शहर पदोन्नतीने), संदीप पाटील (विशेष पोलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र ते विशेष पोलिस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान नागपूर), विरेंद्र मिश्रा (अपर पोलिस आयुक्त मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र), रंजन कुमार शर्मा (अपर पोलिस आयुक्त पुणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे), नामदेव चव्हाण (उपमहानिरीक्षक सीआयडी ते विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य राखीव बल नागपूर), राजेंद्र माने (पोलिस आयुक्त सोलापूर शहर ते सहसंचालक पोलिस अकादमी, नाशिक), विनिता साहू (समादेशक राज्य राखीव बल दौंड ते अपर पोलिस आयुक्त संरक्षण व सुरक्षा मुंबई), एम. राजकुमार (पोलिस आयुक्त जळगाव ते पोलिस आयुक्त सोलापूर शहर), अंकित गोयल (पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण ते पोलिस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र).
शैलेश बलकवडे (समादेशक राज्य राखीव बल पुणे ते अपर पोलिस आयुक्त गुन्हे, पुणे शहर), शहाजी उमाप (पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण ते अपर पोलिस आयुक्त विशेष शाखा, मुंबई), एस. जी. दीवाण (समादेशक राज्य राखीव बल कोल्हापूर ते उप महानिरीक्षक दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, मुंबई), संजय शिंत्रे (पोलिस अधीक्षक सायबर ते उप महानिरीक्षक दक्षता व वस्तू सेवा कर मुंबई), मनोज पाटील (उपायुक्त मुंबई ते अपर पोलिस आय़ुक्त पुणे शहर), विक्रम देशमाने (पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण ते पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण), पंकज देशमुख (पोलिस आयुक्त सीआयडी ते पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण), महेश्वर रेड्डी (पोलिस उपायुक्त मुंबई ते पोलिस अधीक्षक जळगाव), अजय कुमार बन्सल (पोलिस आयुक्त मुंबई ते पोलिस अधीक्षक जालना), रविंद्रसिंह परदेशी (पोलिस अधीक्षक चंद्रपूर ते पोलिस अधीक्षक परभणी), मुमक्का सुदर्शन (पोलिस उपायुक्त नागपूर शहर ते पोलिस अधीक्षक चंद्रपूर), धोंडोपंत स्वामी (पोलिस उपायुक्त मुंबई ते पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण), पंकज कुमावत (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अपर पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण), मितेश घट्टे (अपर पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण ते पोलिस उपायुक्त मुंबई), विक्रम साळी (अपर पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण ते सहायक पोलिस महानिरीक्षक नियोजन व समन्वय मुंबई), आनंद भोईटे (अपर पोलिस अधीक्षक बारामती ते पोलिस उपायुक्त मुंबई), संदीप पखाले (अपर पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण ते पोलिस अधीक्षक नक्षलवाद विरोधी अभियान नागपूर), रमेश धुमाळ (सहायक पोलिस महानिरीक्षक नियोजन व समन्वय ते अपर पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण), समाधान पवार (सह आयुक्त दक्षता अन्न व औषध प्रशासन ते पोलिस उपायुक्त मुंबई).
निसार तांबोळी (विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशासन मुंबई ते सह आयुक्त एसआयडी, मुंबई), ए. डी. कुंभारे (विशेष पोलिस महानिरीक्षक एटीएस ते सह आयुक्त वाहतूक, मुंबई), आर. एल. पोकळे (अपर पोलिस आयुक्त पुणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र), चंद्रकिशोर मीना (अपर पोलिस आयुक्त संरक्षण व सुरक्षा मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक एटीएस मुंबई), आरती सिंह (अपर पोलिस आयुक्त सशस्त्र दल मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशासन मुंबई), राहुल खाडे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते सह आयुक्त दक्षता अन्न व औषध प्रशासन), मुकुंद आघाव (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते अपर पोलिस अधीक्षक एसीबी छत्रपती संभाजीनगर).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.