कोल्हापुरात मारहाणीतील जखमी स्विटमार्ट चालकाचा मृत्यू, दोघांवर खुनाचा गुन्हा
कोल्हापूर : खरा पंचनामा
उद्यमनगर येथील स्विटमार्टमधील पदार्थ फुकट का खायला देत नाहीस, अशी विचारणा करीत दोन गुंडांनी घरात घुसून स्विटमार्टचे मालकास बेदम मारहाण करण्यात आली होती. यातील जखमीचा आज उपचार सुरु असताना मृत्यु झाला. याप्रकरणी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवकुमार लक्ष्मीनारायण बघेल (वय ३३, रा. यादवनगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. २८ डिसेंबर रोज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या मारहाणीतील जखमी बघेल यांचा उपचारादरम्यान सोमवारी (दि. १) सकाळी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. मारहाण करणारे दोघे सध्या पोलिस कोठडीत आहेत.
प्रथमेश सतीश शिंगे (वय २३, रा. यादवनगर, कोल्हापूर) आणि दिलीप हिंदुराव पाटील (वय ३३, रा. रायगड कॉलनी, पाचगाव) या दोघांनी २८ डिसेंबर रोजी उद्यमनगरातील श्रीराम स्विट मार्टचे मालक शिवकुमार बघेल यांना घरात घुसून बेदम मारहाण केली होती. तसेच त्यांनी दहशत माजवण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या वाहनांचीही तोडफोड केली होती. फुकट मिठाई देत नसल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत बघेल बेदम जखमी झाले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी सीपीआरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
निर्मला शिवकुमार बघेल (वय ३३, रा. उद्यमनगर) यांच्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. हल्लेखोर शिंगे आणि पाटील या दोघांना अटक केली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांच्यावर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.