Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ४२ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या, चौघांना पदोन्नती विट्याच्या उपअधीक्षकपदी विपूल पाटील, अप्पासो पवार शाहुवाडीचे उपअधीक्षक

राज्यातील ४२ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या, चौघांना पदोन्नती
विट्याच्या उपअधीक्षकपदी विपूल पाटील, अप्पासो पवार शाहुवाडीचे उपअधीक्षक



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील तब्बल ४२ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये २७ जणांना पदस्थापना देण्यात आली आहे. तर १५ जणांची पदस्थापना नंतर करण्यात येणार असल्याचे बदली आदेशात म्हटले आहे. तर चार उपअधीक्षकांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. 

सांगली जिल्ह्यातील विट्याच्या उपअधीक्षकपदी विपूल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अप्पासो पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडीचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत स्वामी यांची पदोन्नतीने छत्रपती संभाजीनगर येथे सहायक पोलिस आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. सूरज गुरव यांची राज्य अनुसुचित जाती व जमाती आयोगाचे अधीक्षक म्हणून तर गणेश बिरादार यांची नागरी हक्क संरक्षण नाशीकचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. विनायक नरळे यांची मुंबईतील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.  

बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात पदस्थापना : संदेश नाईक (उपअधीक्षक सिरोंदा), चैतन्य कदम (उपअधीक्षक एटपल्ली), अरूण पाटील (सहायक पोलिस आय़ुक्त अमरावती), विशाल क्षीरसागर (सहायक पोलिस आय़ुक्त नागपूर), अरूण पाटील (सहायक पोलिस आयुक्त अमरावती), सतीश कुलकणीर् (उपअधीक्षक अकोला शहर), रविंद्र भोसले (उपअधीक्षक कुरखेडा), राहुल झाल्टे (उपअधीक्षक पालघर), विशाल नागरगोजे (उपअधीक्षक गडचिरोली), अमर मोहिते (उपअधीक्षक भामरागड), रोहिणी बानकर (उपअधीक्षक गोंदिया शहर), सूरज जगताप (उपअधीक्षक गडचिरोली), श्वेता खाडे (सहायक पोलिस आयुक्त नागपूर शहर), मनिषा कदम (उपअधीक्षक देऊळगाव राजा), दिनेश बैसाने (उपअधीक्षक यवतमाळ), अंकिता कणसे (उपअधीक्षक डहाणू), गितांजली दुधाणे (सहायक पोलिस आयुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार), अजय कोकाटे (उपअधीक्षक उपअधीक्षक जिमलगट्टा), समाधान पाटील (उपअधीक्षक देवरी), विनायक कोते (सहायक पोलिस आयुक्त नागपूर शहर), शिरीष वमने (उपअधीक्षक धानोरा), योगेश रांजणकर (उपअधीक्षक हेडरी), सविता गर्जे (उपअधीक्षक पाटण), प्राची करणे (सहायक पोलिस आयुक्त मुंबई), पूजा नांगरे (उपअधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण).

नंतर पदस्थापना करण्यात येणारे अधिकारी : सुहास शिंदे, सुभाष दुधगावकर, साहिल झरकर, पद्मावती कदम, नाता पाडवी, सुदर्शन राठोड, नितीन गणपुरे, संजय पुजलवार, संजीव पिंपळे, सुजितकुमार क्षीरसागर, ब्रम्हदेव गावडे, संकेत देवळेकर, बाबुराव दिडस, विवेक लावंड, जयदत्त भवर.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.