Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण

अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण


पुणे : खरा पंचनामा

पुणे भाजपचे आमदाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. तसेच यावेळी त्यांनी ससून रुग्णलयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमावेळी अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह आदि नेते उपस्थित होते.

यावेळी पुण्याचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ससून रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांच्या उपस्थितीत ही घटना घडली आहे.

भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली. यामुळे कार्यक्रमस्थळी सर्वच जण गोंधळले. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली. ससून रुग्णालयात उद्घाटन पाटीवर नाव नसल्याने कांबळे संतप्त झाल्याने त्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.