दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास अटक
साडेचार लाखांच्या ९ दुचाकी जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून साडेचार लाख रूपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
राहुल प्रशांत रेणके (वय २६, रा. कुन्नूर, ता. निपाणी, जि. बेळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. ११ जानेवारी रोजी सांगलीतील गावभागातून एक दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत देवेंद्र कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर निरीक्षक देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दुचाकी चोरट्याला पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्याचा शोध घेत होते. त्यावेळी पथकाला एकजण कोल्हापूर रस्त्यावरील फळ मार्केट परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाली.
पथकाने फळ मार्केट परिसरात सापळा रचून संशयिताला एका मोपेडसह ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोपेडबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने ती सांगलीतून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, निपाणी येथील ९ गुन्हे उघडकीस आणण्यात सांगली शहर पोलिसांना यश आले आहे.
सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सुधीर माने, सचिन शिंदे, श्रीपाद शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, संदीप कुंभार, गणेश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.