गहाळ झालेले तब्बल पावणेचार लाखांचे मोबाईल दिले परत
विटा पोलिसांचा उपक्रम
सांगली : खरा पंचनामा
प्रवासात, बाजारात, बसस्थानक परिसर अशा गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेले मोबाईल संबंधित नागरिकांना परत देण्याचा उपक्रम विटा पोलिसांकडून राबवण्यात आला. तब्बल पावणेचार लाख रूपये किमतीचे विविध कंपन्यांचे २५ मोबाईल नागरिकांना परत देण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
विटा शहरात खानापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. अनेक शासकीय कार्यालये या शहरात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांसह अन्य शहरांतील नागरिक, विद्यार्थी शिक्षण, नोकरी, बाजार तसेच अन्य कामांसाठी विटा शहरात येत असतात. त्यावेळी प्रवासात, बाजारात बसस्थानक अशा गदीर्च्या ठिकाणी अनेकांचे मोबाईल गहाळ होतात. त्याबाबतच्या तक्रारी विटा पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक डोके आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ मोबाईलची तांत्रिक माहिती काढून राज्यातील विविध भागातून पावणेचार लाखांचे विविध कंपन्यांचे २५ मोबाईल हस्तगत केले. ते मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.