राज्यात आणखी एक काका-पुतण्याची जोडी फुटली
ठाकरेंचा अजितदादांना मोठा धक्का
पुणे : खरा पंचनामा
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांना हा उद्धव ठाकरेंचा दुसरा धक्का आहे.
आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला आहे.
दरम्यान यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मावळ लोकसभेत वाघरेंच्या रुपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रुपाने उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दोन मोठे धक्के दिले आहेत.
डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. त्यांना राष्ट्रवादीमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष देखील आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षानं उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीपमध्ये निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी सोपवली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.