निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना पोलिस कोठडी
जळगाव : खरा पंचनामा
निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांपासून ते फरार होते १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस मुख्यालयात येवून पोलीसांच्या समोर हजर झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, बकाले यांना अटक करण्यात आल्याचे व त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजताच मराठा समाज बांधव तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी न्यायालय परिसरात जमा झाले होते. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्तदेखल तैनात करण्यात आला होता.
किरण कुमार बकाले हे स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर असतांना संभाषणात मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. यामुळे मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण होते.
तत्कालिन पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी मराठा समाज बांधवांना पुढील कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बकालेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरणकुमार बकाले यांना अटक करावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.