संशयितांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पुर्ण
अनिकेत कोथळे खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
बचाव पक्षा तर्फे आरोपी युवराज कामटे व राहूल शिंगटे यांनी सदरचा खटला हा मुंबई उच्च न्यायालयाने एक वर्षांमध्ये समाप्त करावा असा १७ आॅक्टोबर २०२२ रोजी आदेश दिला, सदरकामी सरकार पक्षाचा पुरावा अद्यापी संपलेला नाही. त्यामुळे दि १८ आॅक्टोबर २०२३ रोजी बचाव पक्षाने जामीनावर खुले करावे असा अर्ज सादर केला. त्यावर विशेष सरकारी वकीलांनी एकच साक्षीदार तपासणीचा असून त्यानंतर पुरावा बंद करणार असो लेखी म्हणणे दिले. त्यानंतर ९ तारखां झाल्या. सरकार पक्षाने साक्षीदार आणले नाही. त्यामुळे आता यावर दि. २ फेब्रुवारी रोजी फोटोग्राफर तपासणीसाठी सुनावणी होणार आहे.
सरकार पक्षाचा पुरावा जवळपास पुर्ण झाला आहे व आरोपींना यापुढे न्याय्य कठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, सबब त्यांना जामीनावर खुले करावे असा युक्तिवाद ॲड. विकास बा. पाटील-शिरगांवकर यांना केला. तसेच अनिकेत कोथळे याचे वडिलांचे रक्त तपासणीसाठी पाठविले होते पण त्यांचा अहवाल न्यायालयात सादर केला नाही असे लेखी म्हणणे सीआयडी व विशेष सरकारी वकीलांनी सहीनिशी दिले व तोच मुद्दा ॲड. विकास पाटील -शिरगांवकर यांना पकडून असा युक्तीवाद केला की जर तो अहवाल जुळणारा असता तर सरकार पक्षाने दडविला असता का? मात्र तो हजर न करण्याचे कारण एकच की तो जुळणारा नाही. तसेच तपासी अधिकारी नरेंद्र गायकवाड, बागवडे मॅडम तसेच पंच रजपूत, यासीन पठाण यांच्या सह्या जुळत नाहीत सबब त्याची तपासणी करावी याबाबत सरकार पक्ष म्हणते आहे की त्यांना तपासले नाही सबब बचाव पक्षाचा अर्ज निकाली काढावा.
मात्र या अर्जावर बचाव पक्षाने मुद्दा असा मांडला की सदरचे पंचनामे मग केले कश्यासाठी, जर त्यांना तपासायचे नव्हते तर पंचनामा का केला, बचाव पक्षाने मान्य केला तर साक्षीदार डिसचार्ज होणे वेगळे पण सदरच्या सह्या बनावट आहेत व ते पंचाचे उलट तपासामध्ये समोर येऊ नये हा प्रयत्न केला आहे. तपासा मध्ये सहभागी असलेल्या तपासी अधिकारी यांचे सीडीआर डिटेल्स व टॅावर लोकेशन आरोपीना द्यावे असा मुंबई उच्च् न्यायालयाचा आदेश असताना ते डिटेल्स नाहीत अस सरकार पक्षाचे लेखी म्हणणे न पटणारे आहे. त्यामुळे त्यासंदर्भातील दिलेले सर्व अर्ज मंजूर करावेत असा परखड युक्तीवाद ॲड विकास पाटील -शिरगांवकर यांनी सादर केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.