पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली?
राष्ट्रवादीशी पंगा भारी पडणार!
संभाजी पुरीगोसावी
पुणे : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री आणि तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे सत्तेत आल्यापासून पुण्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी देखील चांगलीच धास्ती घेतली आहे. आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे महसूल विभागात देखील चांगलाच आता मोठा बदल दिसून येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या आता तडकाफडकी बदली होण्याची शक्यता आहे. याची पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे.
सिंह यांच्या जागी सुहास दिवसे, डॉ. राजेश देशमुख या दोन आयएएस अधिकाऱ्यांपैकी एकाची नियुक्ती होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. तसा निर्णय देखील झाला असून कोणत्याही क्षणी शेखर सिंह यांना बदलीचा आदेश येवु शकतो अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे विश्वासू म्हणून राजेश पाटील यांची देखील आयुक्त पदावरुन तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर दि.१६ ऑगस्ट २०२२ रोजी शेखर सिंह यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. शिवसेना आणि भाजपच्या सत्ताकाळात शेखर सिंह यांनी विकासाचा धडाका लावला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींसह भाजप विरोधकांच्या ते कायमच रडारवर राहिले होते. इंटरनेट केबल डकटिंग भामा आसखेड प्रकल्पांतील जेकवेलपासुन वाकडमधील टिडीआरच्या कथित घोटाळ्यापर्यंत शेखर सिंह राष्ट्रवादीचा विरोधकांच्या टीकेचे चांगलेच धनी झाले, त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शेखर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर वारंवार तक्रारी केल्या होत्या.
वाकडमधील टीडीआर प्रकरणामुळे शेखर सिंह विरोधांत वातावरण चांगलेच पोहोचले होते. त्यामुळे शेखर सिंह यांना आता ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वींच बदलीचा सामना करावा लागणार आहे. आता अजित पवारांच्या मर्जींतील अधिकाऱ्याला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचे आयुक्त सुहास दिवसे या दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. हे दोन्ही अधिकारी अजित पवारांच्या खास मर्जींतील असल्यांचे बोलले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.