शरद मोहोळ हत्या प्रकरणाला नवं वळण, ती मोठी व्यक्ती कोण?
पुणे : खरा पंचनामा
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात मुळशीतील गुन्हेगार विठ्ठल शेलार, रामदास मारणे आणि आणखी 10 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री पनवेल घणसोलीतून ताब्यात घेतलं आहे. संध्याकाळी विठ्ठल शेलारसह तीन जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणात गणेश मारणे हे आणखी मोठ एक नाव निष्पन्न झालं आहे.
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ हत्याप्रकरणात पुणे पोलिसांनी विठ्ठल शेलारसह 11 जणांना ताब्यात घेतलं आहे, त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली. शरद मोहोळची हत्या हा मोठा कटाचा भाग असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. विठ्ठल शेलारसह संदीप मोहोळच्या खुनातील मुख्य आरोपी असलेला गणेश मारणेही कटात सहभागी असल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, मात्र अजून गणेश मारणे पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
गेल्या 20 वर्षांपासून पुण्यात सुरू झालेलं टोळी युध्दाचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. मारणे, मोहोळ, शेलार, बोडके या मुळशी तालुक्यातून सुरू झालेल्या टोळीयुध्दातूनच शरद मोहोळचा खून झाल्याच उघड झालंय. राजकीय वजन वाढवलेल्या शरद मोहोळचा भविष्यात त्रास होऊ नये, या भीतीने पछाडलेला संदीप मोहोळच्या खुनातील मुख्य आरोपी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार या आरोपींनी कट करून शरद मोहोळचा गेम केल्याच स्पष्ट झालंय.
टेक्निकल अॅनालिसीस आणि प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार मारणे आणि शेलार यांनी 7 डिसेंबरला भेटून मोहोळ याच्या हत्येच्या कटाची चर्चा केली होती. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. कानगुडे, पोळेकर यांच्याशी असलेल्या शरद मोहोळच्या वादाचा फायदा घेऊन खून केल्याच तपासात समोर आलंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.