मुंबईत धडकी भरण्यास सुरवात!
मराठ्यांचा सीएसएमटीसमोर चक्काजाम
मुंबई : खरा पंचनामा
मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे.
शेकडोंच्या संख्येनं आंदोलक मुख्य रस्त्यावर बसले आहेत. आजचा दिवस (26 जानेवारी) मराठा आरक्षणासाठी निर्णायक राहणार आहे. सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का? पाहिलं जात आहे. मात्र, जरांगे मागण्यांवर ठाम असल्याने सरकार आता यावर कसा तोडगा काढणार? आणि मुंबईमधील परिस्थिती कशी हाताळणार? यावर आता बरच काही अवलंबून असणार आहे.
दरम्यान, सीएसटी परिसरात गर्दी झाल्यानंतर मुंबई पोलिस सक्रिय झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलकांना विनंती करून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी गर्भित इशारा दिला आहे. केवळ सीएसएमटी नाही, तर आम्ही संपूर्ण मुंबईचा ताबा घेणार आहोत, आंदोलकांना आवाहन करतोय की सर्वांनी आझाद मैदानात यावं असं त्यांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.