पहिली ते दहावी मराठी विषय सक्तीचा करा : राज ठाकरे
मुंबई : खरा पंचनामा
मी अत्यंत कडवट मराठी माणूस आहे. माझ्यावर संस्कारही कडवट मराठीचे झाले आहेत. मराठीसाठी अंगावर अनेक केसेस घेतल्या. महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी ऐकलं की त्रास होतो अशा भावना मनजे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी भाषा संपवण्याचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, हे दुर्देवी आहे. इतर भाषा शिका मात्र जिथं राहता तिथली भाषा ही शिकण्याला प्राधान्य द्या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मराठी साहित्यप्रेमींशी संवाद साधला. देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही म्हणत त्यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे. यावेळी त्यांनी मराठी लोक बोलण्यात हिंदी का वापरतात? असा प्रश्न विचारला. राज्यातच मराठीला बाजुला सारण्याचा राजकीय प्रयत्न होत असल्याची खंत व्यक्त करत इतर भाषाही शिका मात्र जिथं राहता तिथली भाषा शिका अस ते म्हणाले.
पंतप्रधानांना त्यांच्या राज्यावरचं प्रेम लपवता येत नाही, तर तुम्ही का लपवता असं ते म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातच मराठी माणसांना घर नाकारलं जात असल्याच दुःख त्यांनी व्यक्त केलं. बाहेरच्या राज्यात स्थानिकांना घर नाकारून दाखवा. महाराष्ट्रात भाषेवर जास्त लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भाषा मेली की सर्व संपलं. तुमची ओळख भाषेनं होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.