मुलाखतीत उतीर्ण करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर; सरकारी अधिकारी सेवेतून बडतर्फ
ग्वाल्हेर : खरा पंचनामा
सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्याच बरोबर उमेदवारांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. असाच एक गैरप्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला असून सरकारी अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे.
ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. आरोपी संजीव कुमार तंतुवे हा मध्य प्रदेश सीड्स अँड फार्म डेव्हलेपमेंड कॉर्पोरेशनमध्ये (MPSFDC) उत्पादन अधिकारी म्हणून सेवेत होता. एका तरुणीने नोकरीसाठी अर्ज केला होता. संजीव कुमार तंतुवे हा तिची मुलाखत घेणार होता. मुलाखतीमध्ये पास करण्यासाठी आरोपी संजीवने तरुणीला शारीरिक संबंध ठेवाण्याची मागणी करणारा मेसेज केला. त्यामुळे तरुणीने आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारदार तरुणीने पोलिसांना आरोपीने पाठवलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट सादर केला. ग्वाल्हेर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून घेतला आणि त्यानंतर आरोपीला उत्पादन अधिकारी पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.
ग्वाल्हेर जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने इतर मुलींना नोकरीसाठी शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर केली होती का याचा तपास आम्ही करत आहोत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.