प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ६२ पदके!
विशेष पोलिस महानिरीक्षक दिलीप सावंत यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक
मुंबई : खरा पंचनामा
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निकेत कौशिक, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप सावंत आणि पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक गुरूवारी जाहीर झाले.
त्याशिवाय मुंबई पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्यासह राज्यातील ४० पोलीस जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी 'पोलीस पदक' तर नक्षलप्रभावीत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेले लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्यासह १८ पोलिसांना 'पोलीस शौर्य पदके' जाहीर झाली आहेत. तसेच कारागृह, नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाला १६ पदके जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ६२ पदके जाहीर झाली असून राज्यातील १८ पोलिस जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस कमलेश नैतम, शंकर बाचलवार, मुन्शी मडवी, सुरज चौधरी, मोहन उसेंडी, देवेंद्र आत्राम, संजय वाचमी, विनोद मडवी, गुरुदेव धुर्वे, दुर्गेश मेश्राम, हिराजी नेवरे, ज्योतिराम वेलाडी, माधव मडवी, जीवन नरोटे, विजय वड्डेटवार, कैलास गेडाम यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस दलातील कायदा व सुव्यस्थेचे सत्यनारायण चौधरी, नागपूर पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्यासह ४० जणांना उल्लेखनीय सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. देशात पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील एकूण एक हजार १३२ कर्मचार्यांना शौर्य, सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पोलीस दलासाठी एकूण एक हजार ३८ पदकांचा समावेश आहे.
उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातील गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण विभागात कार्यरत ७ जणांना पोलीस पदके मिळाली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. रश्मी करंदीकर, नागरी संरक्षण विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजय जाधव, वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण) राजेश्व्ररी कोरी, प्लाटून कमांडर रवींद्र चर्डे, कमांडर अरुण परिहार, गृहरक्षक दलाचे अमित तिंबाडे आणि योगेश जाधव यांचा समावेश आहे. कारागृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तुरुगाधिकारी (अहमदनगर जिल्हा कारागृह) रुकमाजी नरोड, तुरुगाधिकारी (तळोजा मध्यवर्ती कारागृह) सुनील पाटील, सुभेदार (मुंबई मध्यवर्ती कारागृह) बळीराम पर्वत पाटील, सुभेदार (येरवडा मध्यवर्ती कारागृह) सतीश बापूराव गुंगे, हवालदार (कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह) सूर्यकांत पांडूरंग पाटील, हवालदार (येरवडा मध्यवर्ती कारागृह) नामदेव संभाजी भोसले, हवालदार (छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह) संतोष रामनाथ जगदाळे, हवालदार (येरवडा मध्यवर्ती कारागृह) नवनाथ सोपान भोसले, हवालदार (अकोला जिल्हा कारागृह) विठ्ठल श्रीराम उगले यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्वक सेवेबाबत पदक जाहीर झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.