Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गँगस्टर गोल्डी ब्रार केंद्र सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित

गँगस्टर गोल्डी ब्रार केंद्र सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी लखबीर सिंह यालासुद्धा केंद्राने दहशतवादी घोषित केले होते. हे दोघेही कॅनडामध्ये लपून बसलेले आहेत. पंजाबमध्ये खंडणी आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्रासह अंमली पदार्थांच्या तस्करीमध्येही त्यांचा सहभाग आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डीने त्याची जबाबदारी स्वीकारली होती.

गोल्डी ब्रार हा खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी जवळीक ठेवून असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे ब्रार याने यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकी दिली होती. मुंबईतले काँग्रेसचे नेते तथा मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये गोल्डीने धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आता केंद्र सरकारने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत सरकारने गोल्डी ब्रार याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. सतविंदर सिंह उर्फ गोल्डी हा बंदी घालण्यात आलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल नावाच्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये त्याचा हात असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. पंजाबमधील प्रसिध्द गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या घडवून आणण्यामागे गोल्डीचा हात असल्याचे मानले जाते. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याला निकटचा सहकारी म्हणूनही तो ओळखला जातो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.