सांगलीतील सराईत गुन्हेगार दोन जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार
सांगली : खरा पंचनामा
खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
अजय उर्फ अजित पांडुरंग खोत (रा. वडर कॉलनी, सांगली) असे हद्दपार केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर निरीक्षक मोरे यांनी सराईत गुन्हेगारांना कायद्याची जरब बसवण्यासाठी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
गुन्हे प्रकटीकरण शाखेने खोत याच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. तरीही तो त्याच्या घराच्या परिसरातील नागरिकांना त्रास देत होता. त्यामुळे त्याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी त्याला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अफरोज पठाण, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे आदींनी या कारवाईत भाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.