ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची छापेमारी
मुंबई : खरा पंचनामा
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी आज (मंगळवार) सकाळपासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्र मिळतात का? याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भ्रष्ट पद्धतीने जोगेश्वरीतील खेळाचे मैदान ताब्यात घेऊन त्यावर तब्बल 500 कोटी रुपयांचे पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर केला होता. तसेच, यासंदर्भातील तक्रारही सोमय्या यांनी केली होती.
दरम्यान, रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.