हायकोर्टाने फेटाळली जरांगे पाटलांचे आंदोलन रोखण्याची मागणी
मुंबई : खरा पंचनामा
आम्ही मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करण्यापासून कसे अडविणार? हे आमचे काम नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही बसलेलो नाहीत, यापेक्षा बरीच महत्त्वाची कामे आमच्याकडे आहेत, अशा शब्दांत याचिकाकर्ते हेमंत पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहे.
आरक्षण मिळावे, यासाठी साखळी उपोषण करण्याकरिता मुंबईत कार्यकर्त्यांसह येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना रोखावे, अशी मागणी करणारी याचिका पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सदर याचिका दाखल करून घेण्यास नकार देत ती फेटाळली.
शांतता भंग आणि गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी याचिकेद्वारे केली होती. जरांगे पाटील यांनी मराठा व ओबीसी प्रवर्गात दरी निर्माण केली असल्याचेही पाटील यांनी याचिकेत म्हटले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.