अॅड. कोणार्क पाटील यांना आदर्श विधिज्ञ पुरस्कार
पत्रकार दिनानिमित्त केला सन्मान
सांगली : खरा पंचनामा
अॅड. कोणार्क पाटील यांना ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशतफेर् आदर्श विधिज्ञ पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. मिरजेतील बायसिंगर लायब्ररी येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कायर्क्रमात अॅड. कोणार्क पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
कायर्क्रमास जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, प्रमुख पाहुणे म्हणून सांगली येथील प्रसिद्ध सरकारी वकील बाळासाहेब देशपांडे उपास्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या राज्य कार्यकारीणीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सागर बोराडे उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सरकारी वकील देशपांडे, संप्रदा बीडकर, संघटनेचे राज्यसचिव दिपक ढवळे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी पुरस्कारप्राप्त व्यक्तीचा, संघटनेच्या राज्य कार्यकारीणी सदस्यांचा तसेच जिल्हा कार्यकारीणी व तालुका अध्यक्षांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. प्रा. डॉ. सागर बोरोडे यांनी अध्यक्षीय भाषणात वृतपत्र चालवित असताना येणाèया अडचणी विषयी सविस्तर मनोगत व्यक्त केले. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अल्ताफ खतीब यांनी आभार मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.