डायल 112 ला प्रतिसाद न देणाऱ्यांचे वाजविले बारा!
4 पोलिस निरीक्षक 'कंट्रोल'ला 'अॅटॅच'
धुळे : खरा पंचनामा
पोलिस महासंचालक कार्यालयाचा जनहितासाठी डायल ११२ क्रमांक महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. या सेवेतील कर्तव्यात येथे निष्काळजीपणा केल्याने, वॉकी-टॉकीवरील संदेशास तत्काळ प्रतिसाद न देता बराच विलंब केल्याने संतप्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर पवित्रा घेत चार पोलिस निरीक्षकांना 'कंट्रोल रूम'ला 'अॅटॅच' केले, तर तीन हवालदारांना तडकाफडकी निलंबित केले.
डायल ११२ मध्ये जानेवारीत धुळे जिल्हा महाराष्ट्रात शेवटच्या क्रमांकावर आला आहे. ते लक्षात येताच पोलिस अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यातील या सेवेसंदर्भात कर्तव्यतेत सुधारणा व्हावी यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना वेळोवेळी सूचना दिल्या. तरीही काही पोलिस ठाण्यांमध्ये सुधारणा होताना दिसत नव्हती.
वास्तविक, जनतेसाठी ही चांगली योजना आणि मदत कमीत कमी कालावधीत पोचावी यासाठी पोलिस महासंचालक कार्यालय धडपडत असताना धुळे जिल्ह्यात या सेवेसंदर्भात देण्यात आलेले यंत्र-साधन रात्री-पहाटे बंद ठेवणे, चार्जिंग न करणे आदी गंभीर प्रकार तपासणीत समोर आले. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, या सेवेच्या कर्तव्यतेत सुधारणा घडून राज्यात चांगल्या क्रमवारीत स्थान पटकावण्यासाठी पोलिस अधीक्षक धिवरे यांनी कारवाईचा गुरुवारी (ता. २२) कठोर पवित्रा घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.