राज्य मागासवर्ग आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका; मराठा समाजाच्या सर्व्हेला आव्हान
मुंबई : खरा पंचनामा
राज्य मागावसवर्ग आयोगाच्या माध्यमातून सध्या राज्यात युद्धपातळीवर सर्व्हेक्षण केलं जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ओबीसी वेलफेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून मृणाल ढोले यांनी ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेमध्ये मागावसवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या मराठा समाजाच्या सर्व्हेला देखील यात आव्हान देण्यात आलं आहे. या सर्व्हेक्षणासाठी देण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्याची मागणी यातून करण्यात आली आहे. पण या याचिकेवर सुनावणी कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.