शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजितदादांना दिलासा
३ सरकार... अन् फाईल ओपन क्लोजचा योगायोग!
मुंबई : खरा पंचनामा
शिखर बँक प्रकरणामध्ये अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी याबाबतीत क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केलाय. गेल्या वर्षी पोलिसांनी यासंदर्भात तपास करण्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र यंदा त्याच प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट सादर झालाय. त्यामुळे कथित शिखर बँक घोटाळ्याच्या आरोपात अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षभरापूर्वी रिओपनसाठी अर्ज मात्र आता पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय.
करण्यात आलेल्या आरोपातून अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातल्या ४ नेत्यांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी एका प्रकरणात दुसऱ्यांदा यासंदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. सिंचन आणि शिखर बँकेवरून सत्ताधारी भाजपने अनेकदा आरोप केले होते. त्याच प्रकरणात आता सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्यासहित त्यांच्या गटातील अनेक लोकांनाही दिलासा मिळालाय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.