राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगाच्या निकालात मोठा ट्विस्ट!
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर महत्त्वाचा निकाल जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालाची ऑर्डरदेखील समोर आली आहे. विधीमंडळातील संख्याबळाच्या आधारावर हा निकाल देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ट्विस्ट आणणारा एक महत्त्वाची गोष्ट देखील या निकालात समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींचा दोन्ही गटांना पाठिंबा आहे. या लोकप्रतिनिधींकडून निवडणूक आयोगात दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्याचा विचार आता राष्ट्रवादीच्या पुढच्या न्यायालयीन लढ्यासाठी देखील महत्त्वाचा असण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या ऑर्डरमधून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 आमदार आणि 1 खासदार यांनी दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. याबाबत अजित पवार यांनादेखील प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार काहीसे गडबडले. पण त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. याबाबतचा निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.