अशोक चव्हाणांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार!
फडणवीस अन् बावनकुळेंची असणार उपस्थिती
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. यानंतर पुढची राजकीय भूमिका दोन दिवसांत मांडणार असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मात्र राज्यसभेची निवडणुकीसाठी येत्या १५ तारखेला शेवटची तारिख असल्याने अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी १२.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.
अशोक चव्हाण यांच्यासोबत आज भाजपच्या मुंबई येथील कार्यालयात माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी ही महत्वाची घडामोड घडली असून महाराष्ट्रात यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या २८ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमधली देखील राजकीय गणितं बदलली आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता भाजप आपला सहावा उमेदवार देखील देण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.