राज्यातील ८ निरीक्षक, १४ सहायक निरीक्षकांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील पोलिस प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर करण्यात आल्या आहेत. सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत राज्यातील ८ निरीक्षक, १४ सहायक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या सहीने बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेल्या निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली : नवनाथ जगताप (मुंबई शहर ते पुणे), रेश्मा मुलाणी (पीटीसी तुरची मुदतवाढ), जितेंद्र कोळी (सोलापूर ग्रामीण ते पिंपरी चिंचवड), महेश बनसोडे (गोंदिया ते पिंपरी चिंचवड), मंगल मोढवे (पीटीसी नानवीज ते पुणे शहर), अशोक घुगे (मुंबई शहर ते नाशिक ग्रामीण), स्वाती खेडकर (सीआयडी ते पुणे शहर), विजय ढमाळ (नाशिक ते पिंपरी चिंचवड).
बदली झालेल्या सहायक निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली : शैलेंद्र औटे (मुंबई शहर ते नांदेड परिक्षेत्र), शिलप्रभा पाटील (मुंबई शहर ते सीआयडी), अनिल रायपुरे (बदली आदेशाधीन ते ठाणे शहर), किरण इंगवले (बदली आदेशाधीन ते नाशिक परिक्षेत्र), मेघा वर्मा-इरले (ठाणे ते मुंबई शहर), विनोद चव्हाण (यवतमाळ ते सोलापूर शहर), जावेद शेख (मुंबई ते लोहमार्ग नागपूर), क्रांती निर्मळ (लातूर ते सीआयडी), रघुवीर मुऱ्हाडे (मुंबई ते एसआयडी), शरद वायदंडे (बदली आदेशाधीन ते मुंबई शहर मुदतवाढ), सूरज गायकवाड (लातूर ते मुंबई शहर), सुशिला खरात (मुंबई ते सीआयडी), विभावरी रेळेकर (लोहमार्ग नागपूर कोल्हापूर परिक्षेत्र), राहुलकुमार नाईक (मुंबई ते एसीबी).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.