झारखंडच्या वाघाने जिंकलं बहुमत.. चंपाई सोरेनच मुख्यमंत्री!
ऑपरेशन लोटस ठरले अपयशी
रांची : खरा पंचनामा
झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना मागील काही दिवसांपासून वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईतर येथील सरकार अस्थिर झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
मात्र अखेर झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन हेच राहाणार आहे. कारण मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नेतृत्वातील सरकारने आज झालेली बहुमत चाचणी जिंकली आहे. आज झालेल्या बहुमत चाचणी दरम्यान सोरेन यांच्या सरकारच्या बाजूने 47 मतं पडली असून 29 मतं विरोधात पडली आहेत.
झारखंडमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय गदारोळ सुरू आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय संकट उभं ठाकलं होतं. यानंतर चंपई सोरेन यांच्याकडे पक्षाने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर आज चंपई सोरेन यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले. या परीक्षेच सोरेन सरकार पास झालं आहे.
या फ्लोर टेस्टपूर्वी आमदार फुटण्याचा धोका लक्षात घेऊन सोरेन सरकारमधील आमदारांना हैदराबादमध्ये हालवण्यात आले होते. अखेर काल संध्याकाळी सर्व आमदार रांची येथे परतले होते. झारखंडमध्ये ऑपरेशन लोटसचा धोका देखील व्यक्त केला जात होता. मात्र यावेळी झारखंडमध्ये भाजपला यश मिळालेलं नाहीये.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.