झिशान सिद्धिकीना हटवले! मुंबई युवक काँग्रेसला मिळाला नवा अध्यक्ष
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काही दिवसांनी, त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीवर पक्षाने कारवाई केली आणि त्यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे.
सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार होते आणि त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार आणि FDA, (2004-08) राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते आणि यापूर्वी दोन वेळा सलग टर्म (1992- 1997) नगरसेवक म्हणूनही काम केले होते. बाबा सिद्दीकीचा मुलगा झीशान सिद्दिकी सध्या मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून काँग्रेसचे आमदार आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मुलगा आमदार झिशान सिद्दिकीला मुंबई युवक अध्यक्ष पदावरून हटवल्याने आता झिशान सिद्दीकी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता झिशान देखील वेगळा निर्णय घेणार का याकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.